बिग बॉस 6 या शो मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सना खान ही गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. बॉलीवूड मध्ये काही चित्रपटातून काम केलेल्या सना ने काही महिन्यांपूर्वी अभिनय क्षेत्र सोडले असल्याचे सांगितले होते. आता सनाने लग्न केल्याच्या बातमीमुळे ती आणखीन चर्चेत आली आहे.
सना खान हीने काही दिवसांपूर्वी इस्लाम धर्मातील नितींचे पालन करण्यासाठी अभिनय क्षेत्रातून निरोप घेतला होता. त्यावेळी तिने हे जीवन मृत्यूनंतरचे जीवन सुधारण्यासाठी आहे असे म्हटले होते. त्याच विचारांचे पालन करीत सनाने चक्क एका मौलवी सोबत लग्न केले आहे.
सना खान हीने ज्या व्यक्ती सोबत लग्न केले आहे त्यांचे नाव मुफ्ती अनस सईद आहे. अनस सईद हे एक गुजरात मधील मौलवी असून त्यांचा बिझनेस देखील आहे. परंतु बॉलिवुड मध्ये अनेक चित्रपटात मॉडर्न लुक मध्ये दिसलेल्या सनाने मौलवी सोबत लग्न केल्याने चांगलीच ट्रोल झाली आहे.
अनेकांनी कमेंट मध्ये तिची खिल्ली उडविल्याचे दिसून आले. काहींनी म्हटले दोघांची जोडी जराही शोभून दिसत नाही. तसेच, लाखो फॅन्स संभ्रमात पडले होते की सनाने हा निर्णय नेमके का घेतला? आता सनाने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने अनस सोबत का लग्न केले हे एका पोस्ट द्वारे सांगितले आहे.
“आम्ही एकमेकांवर प्रेम केले ते फक्त अल्लाह मुळे, आम्ही एकमेकांसोबत लग्न केले ते फक्त अल्लाह साठी, अल्लाह आम्हाला या जगात एकत्र ठेवावे आणि जन्नत मध्ये पण सोबत ठेवावे.” असे सनाने म्हटले. जय हो, टॉयलेट अशा चित्रपटात काम करणाऱ्या सनाने घेतलेला हा निर्णय अनेकांना धक्का देणारा आहे.
याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका