शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे नेहमी कायम चर्चेत राहतात.तसेच आणखी एका गोष्टीने चर्चेत आले आहेत.त्यांचा काल वाढदिवस होता तरी त्यांनी न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून हा संदेश दिला
“जय महाराष्ट्र !!
15 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस आहे.गेल्या आठ महिन्या पासून आपण सर्व जण कोविड19 चा महामारी चा सामना करीत आहोत.मा.मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार,बृहन्मुंबई महानगरपालिका, डॉक्टर, नर्स, पोलीस अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे तसेच शिवसेनेचे तमाम लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, शिवसैनिकांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्र राज्यातील,मुंबईतील परिस्थिती आटोक्यात येत आहे .ही एक आपल्याआठी आनंदाची बाब आहे.परंतु असे असले तरी देखील वाढदिवसासारखा आनंदोत्सव साजरा करणे उचित ठरणार नाही.आपल्याचे प्रेम,शुभेच्छा, जेष्ठांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहेत.आणि भविष्यात ही असतील याबाबत मी निश्चिन्त आहे”
तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही सोशल मीडिया द्वारे डिजिटल शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना नेते खा.संजय राऊत याना Mardmarathi.com तर्फे वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा..