सोशल मीडिया वर सध्या एका चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे. तो चित्रपट म्हणजेच “लक्ष्मी”. तृतीयपंथी लोकांच्या यातना मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अक्षय कुमार कियारा अडवाणी चित्रपटात असून देखील खरी चर्चा मात्र अभिनेता शरद केळकरची होत आहे.
लय भारी, राम लीला, तान्हाजी, मोहन जोदारो या चित्रपटातून प्रसिध्दी मिळविलेला शरद केळकर आता परत एकदा प्रकाशझोतात आला आहे. लक्ष्मी नामक तृतीयपंथीची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याच शरद केळकरची खऱ्या जीवनातील पत्नी एक अभिनेत्री असून ती दिसायला खूपच सुंदर आहे.
शरद यांच्या पत्नीचे नाव कीर्ती गायकवाड असून दोघांचा विवाह 2005 मध्ये झाला होता. “सात फेरे” या लोकप्रिय हिंदी मालिकेत किर्ती आणि शरद यांनी एकत्र काम केले होते व तिथेच दोघांना प्रेम झाले. “सात फेरे” सोबतच किर्ती ने छोटी बहू, ससूराल सिमर का अशा फेमस मालिकेत काम केले. एका डान्स रियालिटी शो मध्ये पण किर्ती दिसली होती. दोघांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे.
शरद केळकर याची लक्ष्मी चित्रपटातील भूमिका पाहून कीर्ती केळकर हिला शरदचा खूपच अभिमान वाटत आहे. त्या संबंधी किर्तीने पोस्ट देखील केली आहे. “तुम्हाला सांगू शकत नाही इतका मला अभिमान वाटत आहे,” अशा शब्दात किर्तीने शरद केळकरच्या भूमिकेची प्रशंसा केली आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका