गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आपल्या डोळ्या देखत झालेल्या नुकसानाची सरकारकडून भरपाई मिळावी अशी आशा शेतकरी राजा धरून बसला होता. आता चक्क 11 वर्षाच्या मुलीने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मदत मागितली आहे.
मा. मुख्यमंत्री साहेब,
उद्धव ठाकरे साहेब
पत्राचा विषय: माझ्या बाबांनी फटाके व कपडे घेतले नाही.या वर्षी आमच्या गावाशेजारच्या वावरात व कोकण दरीच्या वावरात या वर्षी लय पाणी पटला. माझ्या बाबानी सांगितले.लेय पाणी पडल्यामुळे सोयाबीन आपल्याले कमी झालो. आपल्याकडं पैसे नाहीत.माहे बाबा म्हणतात या वर्षी आपल कर्ज ही माफ झालं नाही.पुन्हा उडीत ही खराब झाले.माझेबाबा रात्री वावरात पाणी द्यायला जातात.
मी म्हणलं की दिवाळीच घरी राहा. पण ते म्हणतात.आपल्या वावरात दिवसा लाइत राहत नाही.त्यामुळं आमचे बाबाही घरी राहत नाहीत. मी आणि माझा भाऊ श्रीकर आम्ही दोघांनी बाबाला म्हणलं की कपडे व फटाके घ्या पण ते म्हणत की नुकसानीचे पैसे बँकेत आल्यावर घेऊ.आम्हाले दिवाळी नाही कपडे नाही फटाके नाही.त्यामुळं आइले म्हणलं तर आई बाबा दोघे भांडण करतात.नुकसानी चे पैसे बँकेत टाकावं.
तुमची समीक्षा सावके वर्ग( 6)
न्यू हायस्कुल गोरेगाव मु.ताकतोडा
ता. सेनगाव जि. हिंगोली पो.हाताळा
या पत्राची दखल घेत श्री संदेशराव देशमुख, छाया ताई, निलेश भाऊ या सर्व मित्र परिवाराने समीक्षा व त्यांच्या परिवाराची दिवाळी गोड केली.त्या सर्व मित्र परिवारास मर्दमराठी तर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा