काही दिवसापूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरू झालेली कारभारी लयभारी या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. अल्पावधीतच मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपली छाप पाडली आहे. आज आपण मालिकेत “वैशाली”(वैशी) हे मात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

कारभारी लयभारी मालिकेत मुख्य अभिनेत्री अनुष्का सरकटे हिच्या मैत्रिणीचे नाव वैशाली आहे. वैशाली हे पात्र “सुप्रिया पवार” या नवोदित अभिनेत्रीने साकारले आहे. सुप्रिया ही मालिकेच्या सुरुवातीच्या काही एपिसोड्स मध्ये धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. मालिकेत ग्रामीण पेहरावात दिसणारी सुप्रिया खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मॉडर्न दिसते.
सुप्रिया पवार ही मूळची मुंबईची असून तिचा जन्म 23 जुलै 1995 रोजी झाला. कुटुंबातून अभिनयाचा वारसा नसलेल्या या अभिनेत्रीने 2017 मध्ये बालनाट्य मधून अभिनयाची सुरुवात केली. नंतर तिने मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस अशा काही मालिकांचे ऑडिशन दिले होते.
सुप्रियाला कुटुंबाकडून अभिनयासाठी परवानगी नव्हती.त्यामुळे सुप्रिया ने जराही खचून न जाता परत ऑडिशन दिले व तिला “बाळूमामाच्या नावाने चांगभलं” या मालिकेत इमानदारीनचे पात्र साकारायला मिळाले. आता ती कारभारी लयभारी मालिकेत स्वतःची छाप पाडताना दिसून येत आहे.
सुप्रिया पवार सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते व तिच्या फोटोज् पाहून खूपच आकर्षक असतात. यामुळे नेहमीच ती आकर्षण ठरत असते. मालिकेत साधारण कपड्यात दिसणाऱ्या सुप्रियाचे हे फोटोज् पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.