2015 साली यूपीएससी परीक्षेत टॉपर झालेली टिना दाबी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविल्यापासून टिनाची ओळख संपूर्ण देशभरात झाली. 2018 मध्ये तिने अतहर आमिर खान सोबत विवाह केला होता. परंतु आता तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
टिना दाबीने ज्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला होता त्याच परीक्षेत अतहर आमिर ने दुसरा क्रमांक पटकाविला होता. नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले व दोघांनी एप्रिल 2018 मध्ये प्रेम विवाह केला होता. अडीच वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. अर्जात दोघे एकत्र राहू शकणार नाहीत व हे विवाह यापुढे ग्राह्य धरले जाऊ नये असे लिहिले आहे.
लग्नानंतर टिना ने सोशल मीडियावर तिच्या नावापुढे खान हे आडनाव लावले होते. परंतु काही दिवसापूर्वी टिनाने खान नाव काढले होते. तेंव्हा पासूनच दोघांच्या दोघांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा रंगत चालली होती. आता शेवटी दोघांनी कोर्टात धाव घेऊन नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोट बद्दल चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.
सोशल मीडियावर या प्रकरणात अतहरला दोषी ठरविले जात असून याला हिंदू मुस्लिम असे वळण देखील दिले जात आहे. काहींनी म्हटले की टिनाचा स्वतंत्रपणे जगण्याचा स्वभाव अतहर व त्याच्या कुटुंबाला आवडत नव्हता. तसेच टिनाने अनेक वेळा हिंदू देवी देवतांचे फोटोज् स्टेटस मध्ये टाकलेले देखील दिसले आहे. हेच दोघांच्या विभक्त होण्याचे कारण असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका