एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलायला एक क्षण पण पुरेसा असतो. आजपर्यंत आपण असे अनेक उदाहरण पाहिले असतील ज्यात काही व्यक्ती रातोरात लोकप्रिय झाले आहेत. आता इंडियन आयडॉल या गाण्याच्या शो मधून एका मराठमोळ्या मुलाचे नशीब बदलणार असे दिसून येत आहे.
सोनी टेलिव्हिजन वर 28 नोव्हेंबर पासून इंडियन आयडॉलचे 12वे सीझन सुरू होत आहे. त्याचा एक प्रोमो चॅनेल ने प्रसारित केले असून त्या प्रोमो मध्ये युवराज मेढे नावाचा एक मराठी मुलगा गाताना दिसून येत आहे. त्याच्या प्रोमोची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. कारण प्रोमो मध्ये त्याच्या गाण्याचे जजकडून भरभरून कौतुक करण्यात आलेले दिसून आले.
युवराज मेढे हा मूळचा जळगावचा असून तो गेल्या काही वर्षांपासून इंडियन आयडॉलच्या सेटवर साफसफाईचे काम करायचा. परंतु यावर्षी त्याने गाणे म्हणण्याचा निर्णय घेतला. युवराजने “खेळ मांडला” हे गीत इतक्या सुंदरपणे गायले की जज नेहा कक्कर, विशाल दादलानी, हिमेश रेशमिया यांना अश्रू आवरता आले नाहीत.
युवराजने गाणे गायल्या नंतर म्हटला, “शो मध्ये एखाद्या स्पर्धकाकडून चूक झाली आणि जज त्यांना काय सांगतात हे ऐकून मी शिकत गेलो.” यावर हिमेश रेशमियाने म्हटला की “तू हर एक भारतीयाची आशा आहेस, माणूस कोठूनही मोठा होवू शकतो फक्त मेहनत करायची गरज आहे. या गाण्यानंतर युवराजला पुढच्या फेरीसाठी निवडण्यात आले आहे.