मागील काही दिवसांपासून बॉलिवुड मध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अगोदर नेपोटिस्म मुळे चांगलीच चर्चा झाली होती, तर आता काही अभिनेत्रींनी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. सना खान या अभिनेत्री नंतर आता आणखीन एका अभिनेत्री बॉलिवूडचा निरोप घेतला आहे.
सना खान या अभिनेत्रीने इस्लाम धर्मातील नीतींचे पालन करण्यासाठी बॉलिवूडचा निरोप घेतला होता. आता तसाच काहीसा निर्णय दंगल चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीम हीने घेतला आहे. बॉलीवूड मधील तिच्या पहिल्याच चित्रपटाने(दंगल) रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.
खरे तर झायरा ही वयाने फक्त 20 वर्षाची असून तिला बॉलिवुड मध्ये आणखीन घवघवीत यश मिळाले असते. परंतु आता झायरा वसीम हीने एक पोस्ट करीत म्हटले की, तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार, तुम्हीच माझी शक्ती आहात. मी आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करीत आहे.”
तसेच, पुढे झायरा म्हणाली, “मी विनंती करते की, तुमच्या अकाऊंट वरील माझ्या सर्व फोटोज् डिलीट करा. किमान माझ्या फॅन पेजेस ना मी विनंती करते की तुम्ही दुसऱ्यांना देखील डिलीट करायला सांगा. यामुळे माझ्या नवीन अध्यायासाठी मदत होईल.” सना व झायराने ने घेतलेल्या या निर्णयामुळे बॉलीवूड मध्ये एकच खळबळ माजली आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका