छोट्या पडद्यावर अशा काही मालिका आहेत, ज्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहू शकतील. एकता कपूरच्या कहाणी घर घर की, क्यूंकी सास भी कभी बहू थी अशाच काही मालिकांनी टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडून काढले होते. तसेच, सोनी सब वाहिनीवरील “तारक मेहता का उलटा चष्मा” या मालिकेने तर लोकप्रियतेची सर्वोत्तम सीमा गाठली आहे.

“तारक मेहता का उलटा चष्मा” ही मालिका जुलै 2008 मध्ये सुरू झाली. तेंव्हापासून मालिकेत अनेक चढ उतार पाहायला मिळाले होते. काही सदस्यांनी मालिका सोडली, तर काही सदस्यांचे निधन देखील झाले. आता मालिकेच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण, या मालिकेच्या महत्त्वपूर्ण सदस्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेसाठी लेखनाचे काम करणाऱ्या अभिषेक मकवाना या व्यक्तीचे निधन झाले आहे. अभिषेक यांनी मालिकेसाठी अनेक महत्वाचे भाग लिहिले होते. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक नोट लिहिली होती, ज्यात त्यांनी आर्थिक समस्या असल्याचे लिहिले होते.
आता स्पष्ट झाले आहे की अभिषेक यांच्यासोबत सायबर फसवणूक झाली होती, यातूनच त्यांना खूप सारा पैसा गमवावा लागला होता. मालिकेसाठी एका पेक्षा जास्त लेखक असल्याने मालिका पुढे चालू राहणार आहे. परंतु, एक उत्तम लेख गेल्याचे मालिकेच्या दिग्दर्शकांनी म्हटलं आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.