काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हीचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर मयुरी देशमुख हिला खूप मोठा धक्का बसला होता. मयुरीला या धक्यातून सावरायला अनेक दिवस लागले होते. तिला अनेकांनी धीर देण्याचा प्रयत्न केला होता.

Actress mayuri on dr shital


धीर देणाऱ्या लोकांमध्ये डॉ. शीतल आमटे यांचे देखील नाव होते. हे वाचून अनेकांना धक्का बसला असेल. कारण डॉ. शीतल आमटे यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. परंतु, आशुतोषच्या आत्महत्येनंतर शीतल आमटे यांनी मयुरीला जे काही बोलले ते वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Actress mayuri on dr shital

 

29 जून 2020 रोजी आशुतोषने आत्महत्या केल्यानंतर शीतल यांनी मयुरीला स्वतः मेसेज केला होता. त्यांनी मयुरीला म्हटले होते की “मी तुझ्या मागे खंबीरपणे उभे आहे”. तसेच त्यांनी मयुरीला धीर दिला व मयुरीच्या धीराचे कौतुक देखील केले होते. शीतल यांनी स्वतः मयुरीला त्यांचा नंबर दिला व तिचा नंबर देखील घेतला होता.

Actress mayuri on dr shital

इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाने विचारपूस केल्याने त्यांचा तो मोठेपणा मयुरीला खूपच भावला होता. तसेच आशुतोषच्या निधनापूर्वी मयुरीने शीतल यांचा एक व्हिडिओ आशुतोषला दाखविला होता ज्यात त्यांनी डिप्रेशनचा कसा सामना केला होता, ते सांगितले होते.


आता डॉ. शीतल आमटे यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला असल्याचे व ती परत एकदा अस्वस्थ झाल्याचे म्हटले आहे. दुसऱ्याला इतके छान समजावनाऱ्या महिलेने स्वतः आत्महत्या केल्याने मयुरीला धक्का बसला असावा. तुम्हाला कसलाही त्रास असेल तर तुम्ही ते कोणाजवळ तरी बोलत रहा, असे मयुरीने पुढे म्हटले आहे.

 


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.