झी मराठी वाहिनीवर सध्या सर्वात जास्त लोकप्रिय होत असलेली मालिका “माझा होशील ना?” सर्वांनाच आवडू लागली आहे. या मालिकेतील सई – आदित्यची प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडत आहे. यामुळेच मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील चांगली वाढ होताना दिसून येत आहे.
“माझा होशील ना?” मालिकेत सध्या सई आदित्य या दोघात प्रेमाचा रंग जरा जास्तच बहरून आलेला दिसून येत आहे. त्या दोघांचे मालिकेतील “तुझ विन मी” हे गाणं देखील प्रेक्षकांना खूप आवडू लागले आहे. त्यामुळे या जोडीने खऱ्या आयुष्यात लग्न करावे असे अनेक फॅन्सना वाटत असते.
आता असाच एक प्रश्न एका फॅनने विराजस कुलकर्णीला(आदित्यला) विचारला. “तुम्ही दोघे एकमेकांनसाठीच बनलो आहोत.” यावर विराजसने एकदम मजेशीर उत्तर दिले. “आठविते ना, लहानपणी शक्तिमान पकडेल म्हणून लोकं उंचावरून उड्या मारायचे. रील आणि रियल लाईफ दोन्ही खूप खूप वेगळ्या असतात.”
तसेच, आदित्यला एका मुलीने सरळ सरळ “थर्ड क्लास ॲक्टर” अशी कमेंट केली. त्यावर देखील विराजस ने नम्रपणे रिप्लाय केला, “आता ही गोष्ट मला दुःखी करीत आहे.” फॅन्स ना असे रिप्लाय दिलेले पाहून विराजस मधील साधेपणा दिसून येत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका