काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने एकच खळबळ माजली होती. सुशांतच्या निधनाने लाखो फॅन्सना व त्याच्या जवळच्या काही व्यक्तींना मोठा धक्का बसला होता. त्यातच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला या घटनेतून सावरायला अनेक दिवस लागले.
सुशांत व अंकिता लोखंडे या दोघांच्या रिलेशन बद्दल सर्वांनाच माहिती आहे. दोघांनी लग्न करण्याचे स्वप्न देखील पाहिले होते. परंतु कालांतराने दोघे विभक्त झाले. परंतु सुशांतच्या निधनानंतर सुशांतला व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अंकिताने बरेच प्रयत्न केले होते. आता अंकिता ते दुःख विसरत साधारण जीवन जगताना दिसून येत आहे.
आज 19 डिसेंबर रोजी अंकिताचा वाढदिवस असून रात्री 12 वाजताच अंकिताने तिचा वाढदिवस साजरा केला. अंकिताने तिचा वाढदिवस पती विक्की जैन, मित्रपरिवार सोबत साजरा केला. पती विक्कीने तिच्या वाढदिवसानिम्मित छोटीशी तयारी करून तिला सरप्राइज दिले. त्याचाच हा व्हिडिओ :
वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी अंकिताने हाथ जोडून व डोळे झापुन प्रार्थना करताना दिसली. यावरून अनेक फॅन्स ना असे वाटले की अंकिताने सुशांतला मिस केले. अंकिताने फोटोच्या कॅपशन मध्ये “विषेश आणि प्रे” असे लिहिले. म्हणजेच तिने देवाकडे काहीतरी प्रार्थना व मागणी केल्याचे दिसून येत होते. सुशांत ची बहिण श्वेता ने “हॅप्पी बर्थडे ब्युटीफूल” अशी कमेंट केली.
अंकिता लोखंडे हिला मर्द मराठी तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरु नका