नवीन वर्षाचे स्वागत हे दरवर्षी एकदम जल्लोषात व उत्साहात साजरी केले जाते. तसेच, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकजण पर्यटनला जाऊन पार्टी करीत असतात. बॉलिवुड मधील काही अभिनेत्रींनी स्वतःच्या अशा काही बोल्ड फोटोज् पोस्ट केल्या ज्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा होताना दिसून येत आहे.
बॉलिवुडची सर्वात जास्त फिट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा हीने स्विमिंग पूल शेजारी बसून काढलेल्या फोटोज् ने फॅन्स ना भुरळ घातली आहे. मलायका सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत असून तीच्या सोबत बॉयफ्रेंड अर्जुन कपूर देखील आहे. तिच्या बोल्ड फोटोज् मुळे ती युवा पिढीचे आकर्षण ठरत आहे.
कबीर सिंग चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी अल्पावधीतच अनेकांची आवडती झाली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कियाराने सध्या मालदीव येथील एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. कियारा सोबत तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील असल्याचे समजते. तसेच, मालदीव मध्ये, ईशान खट्टर आणि अनन्या पांडे देखील असल्याचे समजते.
धोनी : द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून प्रसिध्दी मिळविणारी अभिनेत्री दिशा पटाणी ने देखील अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. सध्या दिशाने समुद्रात उभी राहिलेली स्वतःची बिकनी पोस्ट करून फॅन्स मध्ये भुरळ घातली आहे. तिच्या या फोटोला तब्बल 24 लाख लाईक्स मिळाले असून कॉमेंट्सचा देखील वर्षाव होताना दिसून येत आहे.
आपल्या हॉट अदानी फॅन्सना घायाळ करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील सध्या तिच्या बिकनी फोटोज् मुळे चर्चेचा विषय ठरत आहे. मल्लिका सध्या केरळ येथे असून गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, टिव्ही वरील बोल्ड अभिनेत्री नीया शर्मा हीने देखील स्वतःची बिकनी फोटो पोस्ट करून सर्वांना आकर्षित केले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका