झी मराठी वाहिनीवर रात्रीस खेळ चाले या मालिकेची जागा घेतलेल्या “देवमाणूस” या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील टोण्या, आज्जी हे कलाकार फॅन्स ना नेहमीच हसविताना दिसून येत असतात. मालिकेतील मंजुळाचे पात्र साकारणारी अभिनेत्री ही युवा पिढीची आकर्षण ठरत आहे. आज आपण तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

Devmanus serial Manjula biography


“देवमाणूस” मालिकेत मंजुळाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव आहे प्रतीक्षा जाधव. प्रतीक्षा ही मूळची असून तिचे शिक्षण पुण्याच्या हडपसर येथे झाले आहे. नंतर प्रतीक्षा ने अनेक हिंदी व मराठी मालिकेत, व काही चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली. सध्या देवमाणूस मालिकेतील मंजुळा ने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे.

Devmanus serial Manjula biography

 

देवमाणूस मालिकेत अजितकुमार देव हा मंजुळाच्या नेहमीच पाठीमागे असलेला दिसून येत असतो. मंजुळाचा जमिनीचा सौदा झाल्यास ती मुंबईला जाणार असते. असे होवू नये यासाठी अजितकुमार वाटेल ते करायला तयार असल्याचे दाखविण्यात येत आहे. यामुळे मालिकेत आणखीन रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

 

 

देवमाणूस मालिकेत येण्यापूर्वी प्रतीक्षा जाधव हिने “दिल ढूंढता हैं” या हिंदी मालिकेत आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तसेच छोटी मालकीण, मोलकरीण बाई, मेहंदीच्या पानावर, दिल्या घरी सुखी राहा या मराठी मालिकेत देखील उत्तम भूमिका साकारली होती. जखमी पोलीस, अरे देवा अशा अनेक चित्रपटात पण प्रतीक्षाने काम केले आहे.

Devmanus serial Manjula biography
देवमाणूस मालिकेत नेहमी साडीवर दिसणारी मंजुळा म्हणजेच प्रतीक्षा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मॉडर्न राहत असल्याचे दिसून येते. सोंदर्या प्रमाणेच तिच्या आवाजात व अभिनयात परिपक्वता दिसून येते. प्रतीक्षा जाधवला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Devmanus serial Manjula biography

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *