2020 हे संपूर्ण वर्ष संपूर्ण जगासाठी धोकादायक असेच ठरले. या संपूर्ण वर्षात एकीकडे कोरोनामुळे अनेकांचे जीव गेलेले दिसले तर दुसरीकडे कला क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींच्या निधनाच्या वार्ता ऐकावयास मिळाल्या. आता आणखीन एका टिव्ही अभिनेत्रीच्या निधनाने एकच खळबळ माजली आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री “दिव्या भटनागर” या अभिनेत्रीचे गेल्या सोमवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचे उपचार चालू असतानाच अचानक हृदयाची प्रक्रिया बंद पडल्याने दिव्याचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले. दिव्याच्या निधनाच्या काही तासांनंतर तिच्या कपाटातून चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.
दिव्याचा भाऊ देव भटनागर याला ती चिठ्ठी सापडली असून त्या चिठ्ठीत दिव्याने तिचा नवरा गगन गबरू तिला खूप त्रास देत असल्याचे लिहिले होते. दिव्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हीने देखील गगणवर एका व्हिडिओ द्वारे गंभीर आरोप लावले आहेत व या प्रकरणाचा लवकर छडा लावावा यासाठी मुंबई पोलिसाकडे विनंती केली आहे.
दुसरीकडे गगन याने हे सर्व आरोप फेटाळून लावून दिव्या व माझे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे म्हटले आहे. परंतु देवोलिनाने सर्व पुरावे सोशल मीडियावर पोस्ट करून गगन गबरुच्या अडचणी वाढविल्या आहेत. यामध्ये दिव्याचे जूने मेसेजेस, कॉल रेकॉर्डींग हे सर्वकाही देवोलिना पोस्ट करताना दिसून येत आहे.
तसेच देवोलिनाने दिलेल्या पुराव्या नुसार गगन हा दिव्याला बंद खोलीत बेल्टने मारायचा असे दिसून येत आहे. तसेच, दिव्याच्या अंगावरील जखमाच्या फोटोज् देखील देवोलिना ने शेअर केल्या आहेत. सुशांत प्रकरणाचा उलगडा झाला नाही तोपर्यंतच आता या प्रकरणाचे मुंबई पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा व शेयर करायला विसरू नका..