महाराष्ट्रात सध्या समाजसेविका डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आयुष्यभर समाजसेवा करणारे, कुष्ठरोग्यांना मदतीचा हाथ पुढे करणारे डॉ. बाबा आमटे यांच्या नात व विकास आमटे यांची कन्या होत्या. अशा थोर व सुशिक्षित परिवारातील व्यक्तीने आत्महत्या केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शीतल आमटे या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ होत्या. बाबा आमटे यांचे आदर्श घेऊन त्यांनी अनेक वर्ष समाजसेवा केली होती. दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी शीतल यांनी विषारी इंजेक्शन लावून आत्महत्या केली. नंतर त्यांना वरोरा येथील रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले होते.
शीतल यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक जुने व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचा पुढारी या वृत्तसमुहाला बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शीतल आमटे या स्वतः आत्महत्या बद्दल विचार यापूर्वीही मनात आलेले सांगितले होते. हा विचार त्यांना त्यांच्या लग्नानंतर आला होता.
शीतल यांचा विवाह गौतम कराजगी यांच्याशी झाल्यानंतर त्या श्रीलंकेला स्थायिक झाल्या होत्या. परंतु तिथे गेल्यास 15 दिवसांनी त्यांना आत्महत्येचा विचार आला होता. आपण जगायचं तर कशासाठी जगायचं असे त्यांनी म्हटले होते. परंतु नंतर त्यांनी योग्य उपचार घेऊन डिप्रेशनला दूर केले होते. परंतु कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तुमच्याआशुतोषच्या आत्महत्येनंतर शीतल आमटे यांनी मयुरीला जे सांगितले होते ते ऐकून आश्चर्य वाटेल
प्रतिक्रिया कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.