भारतीय टिव्ही मालिका व चित्रपटांना निर्माती/दिग्दर्शिका एकता कपूर हिने जगाला वेगळीच ओळख करून दिली. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची कन्या असलेल्या एकताने अनेक रेकॉर्डब्रेक मालिका व चित्रपट प्रेक्षकांना दिले. सध्या एकता कपूर तिच्या वैयक्तिक जीवनामुळे सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे.

एकताच्या मालिकांमध्ये अनेकदा आपण सुंदर प्रेमकथा पाहिल्या असतील. परंतु आता एकता स्वतः एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याचे ऐकायला मिळत आहे. तिच्या एका इंस्टाग्राम पोस्ट वरून तिने स्वत: एका व्यक्तीसोबत फोटो पोस्ट करीत दोघात प्रेम असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले. त्यामुळे एकता लवकरच लग्नबंधनात देखील अडकण्याची शक्यता आहे.
एकता कपूर सोबत वरील फोटोमध्ये दिसत असलेल्या त्या व्यक्तीचे नाव आहे तन्वीर बुकवाला आहे. तन्वीर हा एक सुप्रसिद्ध लेखक आहे. तसेच, तो डिंग एन्टरटेन्मेंटचा संस्थापक देखील आहे. दोघांच्या फोटोला एकताने असे कॅप्शन दिले, “आता आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत, मी लवकरच तुम्हाला सर्वकाही सांगेल.”
या पोस्ट वर तन्वीर ने कमेंट करताना म्हटले, “या मैत्रीला आता नात्यात बदलण्याची वेळ आली आहे.” यामुळे अनेक नेटकऱ्यानी दोघांना शुभेच्छा देखील दिल्या. 45 वर्षीय एकता कपूर ने गेल्याच वर्षी सरोगसी मार्फत एका मुलाला जन्म दिला होता. तन्वीर सोबत रिलेशन मध्ये आल्यामुळे उशीरा का होईना एकता शेवटी लग्न करणार हे नक्की आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.