कोणत्याही व्यक्तींचा जन्म हा नशिबावर अवलंबून असतो. कोणाचा जन्म गरीब कुटुंबात होत असतो, तर कोणीतरी नशीब घेऊनच जन्माला येत असतो. परंतु संकटावर मात करून जो आनंदी जीवन जगत असतो त्याचेच जीवन सार्थक होत असते. आज आम्ही अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जिच्या कहाणी वाचून तुम्हाला तिचा अभिमान वाटेल.

Gauri sawant biography


पुण्यातील सावंत कुटुंबाच्या एका सामान्य घरात एका मुलाने जन्म घेतला होता. अगोदर मोठी मुलगी असल्याने सावंतांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. नंतर कालांतराने त्यांना कळू लागले की हा मुलगा नसून हा वेगळाच आहे. त्यानंतर त्या मुलाकडे पाहण्याचा घरच्यांचा दृष्टिकोन बदलला होता.

Gauri sawant biography

लहानपणी त्याच मुलाला तू मोठे होवून काय बनणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने मला मोठे होवून आई बनायचं आहे असे म्हटला होता. मुलगा कधी आई बनत नसतो हेच सर्वांनी त्याला सांगितले. समाज त्याला स्वीकारत नसल्याने तो मुलगा मुंबईला पळून गेला. तो मुलगा तृतीयपंथी असून तीचे सध्या नाव आहे गौरी सावंत.

Gauri sawant biography

गौरी सावंत हे नाव सध्या खूप लोकप्रिय झाले आहे. लहानपणी आई होणार असे स्वप्न बाळगणाऱ्या गौरीने नंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका मृत महिलेच्या मुलीला आपलेसे केले आहे. तिचे नाव गायत्री ठेवले असून त्या दोघी एका जाहिरातीत देखील झळकल्या आहेत.

गौरी सावंत हिला निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून देखील नेमणूक केली होती. या अंतर्गत गौरीने ग्रहिणी, तृतीयपंथी व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन केले होते. या व्यतिरिक्त गौरी समाज कार्यात देखील नेहमीच अग्रेसर असते. अशा या गौरी सावंतला आमचा सलाम.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.