इंडियन आयडॉलच्या नव्या पर्वात एकापेक्षा एक सिंगर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 28 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालेल्या 12 व्या सीझन मध्ये आत्तापर्यंत थक्क करणारे ऑडिशन पाहायला मिळत आहेत. यात काही नवीन चेहऱ्यासोबतच जुने चेहरे देखील सहभागी झालेले दिसून येत आहेत.
आता या नव्या पर्वात अशाच एका सिंगर ने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या सिंगरचे नाव आहे जेली काई. जेली हा अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगर येथील रहवासी आहे. जेली ऑडिशन वेळी स्वतःची माहिती देताना त्याने अरुणाचल प्रदेश मधील अनेक चित्रपटासाठी गायले असल्याचे सांगितले.
तसेच, जेली हा अरुणाचल प्रदेश येथील एका गाण्याच्या शोचा जज देखील राहिल्याचे त्याने स्वतः सांगितले. जेलीने ऑडिशन साठी नेहा कक्करचेच “ओ हमसफर” हे गाणे म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला मुलाच्या आवाजात गायल्यानंतर जेलीने चक्क मुलीच्या आवाजात गायला सुरुवात केली.
मुलीच्या आवाजात गाणे ऐकून विशाल दादलानी, नेहा कक्कर, हिमेश रेशमीया हे तिन्ही जज एकदम थक्क झाले. कारण जेलीने मुलाच्या आवाजात जितके सुरेल गायले तितकेच सुरेल मुलीच्या आवाजात देखील गायले. सर्वांनी त्याची प्रशंसा करीत त्याला गोल्डन तिकीट दिले.
खरे तर जेली काई हा कोणी नवीन चेहरा नाही. तो यापूर्वी इंडियन आयडॉलच्या 9 व्या सीझन मध्ये देखील आला होता. परंतु त्या सीझन मध्ये तो जास्त पुढे जाऊ शकला नव्हता. मला समाजात मुलीच्या आवाज काढल्याने चिडविले जाते असे त्याने म्हटल्या नंतर त्यावेळी सोनू निगम ने स्वतः मुलीच्या आवाज काढून त्याला प्रोत्साहन दिले होते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका