प्रत्येक क्षेत्रातील सेलिब्रिटींना त्यांचा चाहत्यांकडून प्रेम मिळालेले दिसून येते. काही काही फॅन्स आपल्या आवडत्या सेलेब्रिटी साठी इतके वेडे असतात की त्यांच्या प्रेमापोटी काहीही करायला तयार होतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला एकदा तरी भेटता यावे यासाठी प्रयत्न करतात.

मराठी अभिनेता नितीश चव्हाण याची व लागिर झालं जी मालिकेची श्रावणी नामक एक चाहती होती. तिचे अकाली निधन झाल्याची वार्ता ऐकून नितीश खूपच भावूक झाल्याचे दिसून येत आहे. नितीश ने एक पोस्ट करीत असे म्हटले, “तुझ्याबद्दल बातमी कळाली, खूप वाईट वाटलं. तुझ्या हृदयात छिद्र आहेत हे मला माहिती नव्हते.”
पुढे नितीश ने लिहिले, “मला भेटण्याची तुझी शेवटची इच्छा होती, हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. मी बऱ्याच जणांकडून तुझ्या बाबतीत ऐकलं होते. पण मला भेटण्यासाठी तू काय काय केलंस हे ऐकून धक्काच बसला. मला वाटलं नव्हतं की भेटण्यासाठी कोणी इतके काही करेल. सलाम आहे तुला.”
“तुझ्या सारखे फॅन होणे अशक्य आहे. माफ कर मला. याजन्मी भेटू शकलो नसलो तरी पुढच्या जन्मी मी तुझा फॅन होवून नक्की भेटेन. इतके प्रेम देण्यासाठी खूप खूप आभारी आहे तुझा. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.” अशा भावूक शब्दात नितीश ने श्रावणीला श्रद्धांजली वाहिली. ही पोस्ट पाहून अनेक फॅन्स ना अश्रू आवरता आले नसल्याचे कमेंट मधून दिसून आले.
नितीश व लागिर झालं जी मालिकेची फॅन असलेल्या त्या मुलीचे नाव श्रावणी प्रकाश दौंडकर हे होते. ती इंस्टाग्राम वर “टीम लागिर झालं जी” नावाचे फॅन अकाऊंट चालवायची. त्या अकाऊंट वर लागिर झालं जी मालिकेतील सर्व कलाकारांच्या फोटोज् दिसून येत आहेत. परंतु तीचे नितीश वर असलेले अधिक प्रेम पाहूनच नितीश दुःखी झालेला दिसून आला.
मर्द मराठी तर्फे श्रावणीला भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हीही कमेंट मध्ये श्रद्धांजली द्या व शेयर करायला विसरू नका