2020 या वर्षी संपूर्ण जगाला संकटाचा सामना करावा लागला. हे वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक असतानाच आणखीन एक वाईट घटना घडलेली ऐकायला मिळत आहे. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)च्या एका मोठ्या सुपरस्टारचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार ल्यूक हार्पर याचे वयाच्या 41 व्या वर्षीच निधन झाल्याने WWE स्पर्धकांमध्ये व फॅन्समध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. ल्यूक हार्पर याला गेल्या काही महिन्यांपासून फुफुसाचा आजार होता. त्याचा दवाखान्यात उपचार देखील चालू होता. परंतु रविवार दिनांक 27 डिसेंबर रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला.
ल्यूक हार्पर ने आपल्या रेसलींग करिअरची सुरुवात ब्रे वायट सोबत पदार्पण केले होते. 2013 मध्ये ब्रे वायट, ल्यूक हार्पर व एरिक रोवन यांची मजबूत टीम तयार झाली होती. ब्रे वायटच्या टीमला लूकच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. तसेच, या रेसलरच्या अचानक झालेल्या निधनाने परत एकदा स्पर्धकांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
ल्यूक हार्परच्या टीमचा टॅग टीम गटात मोठा दबदबा होता. वायट परिवाराचा ल्यूक हार्पर हा एक महत्त्वाचा सदस्य होता. टॅग टीम सोबतच ल्यूक हार्पर ने इंटरकांटिनेंटल चैंपियनशीपचा देखील पुरस्कार मिळविला. अनेक WWE सुपरस्टारने ल्यूक हार्परच्या निधनाने मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका.