झी मराठी वाहिनीवरील “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. कारण काही दिवसांपूर्वी मालिकेची खलनायिका नंदिता हे पात्र बदल करण्यात आले होते. धनश्री कडगावकर ऐवजी आता “माधुरी पवार” ही अभिनेत्री मालिकेत दिसून येत आहे.
माधुरी पवारचा जन्म सातारा शहरात झाला असून तिचा जन्म 21 मार्च, 1993 रोजी झाला होता. तिने महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले असून तिने एमबीएची पदवी देखील घेतली आहे. अगोदर पासूनच अभिनय व डान्सची आवड असलेल्या माधुरीला टिकटॉकमुळे अधिक लोकप्रियता मिळाली होती.

सोशल मीडियावर माधुरी सारखे ॲक्टिव क्वचितच एखादी अभिनेत्री राहत असेल. तिचे अनेक डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. तिच्या डान्स व्हिडिओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. आता माधुरीचा “टीप टीप बरसा” या गाण्यावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पाहा व्हिडिओ :
वरील व्हिडिओमधील माधुरीच्या बोल्ड डान्समुळे प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. माधुरी या अगोदरही टेलिव्हिजन वर आली असून ती झी युवा वरील अप्सरा आली या डान्स शो मध्ये सहभाग घेतला होता. या शोच्या 2019 मधील पर्वाची ती विजेती देखील झाली होती. तसेच, तिचे “आभाळ हे भरलं” हे अल्बम देखील प्रदर्शित झाले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.