गेल्या अनेक महिन्यापासून काही मराठी कलाकारांचा साखरपुडा तर काहींचे लग्न झाल्याचे ऐकण्यात आले. यामध्ये नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपानकर, तेजपाल वाघ, कार्तिकी गायकवाड, अभिज्ञा भावे यांचा समावेश होता. तसेच, काही दिवसांपूर्वी या यादीत लोकप्रिय अभिनेत्री व डान्सर मानसी नाईक हिचे देखील नाव समाविष्ट झाले होते.

Mansi Naik marriage news


आपल्या दिलखेच अदानी तरुण पिढीला घायाळ करणाऱ्या मानसी नाईकचा साखरपुडा 10 नोव्हेंबर 2020 रोजी झाला होता. ज्या व्यक्तीसोबत मानसीचा साखरपुडा झाला त्या व्यक्तीचे नाव प्रदीप खरेरा आहे. प्रदीप खरेरा हा कोणी साधारण व्यक्ती नसून तो एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. दोघांच्या साखरपुड्याला अभिनेत्री दिपाली सय्यद व मानसी चे आई वडील इतकेच उपस्थित होते.

Mansi Naik marriage news
मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा केलेल्या मानसी नाईकचे लग्न मात्र धूमधडाक्यात होणार असल्याचे समजते. दोघांचा विवाह 19 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. याबाबतीत स्वतः मानसी नाईक ने एका पोस्ट द्वारे सांगितले. खरे तर मानसी व प्रदीप हे खूप महिन्यांपासून एकमेकांना डेट करी होते.

 

प्रदीपने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पयनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना आशिया गटातून विजय मिळविला होता. प्रदीप किती फिट आहे हे नेहमीच त्याच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळत असते. मानसी सोबत नात्यात अडकून प्रदीप खूप आनंदी असल्याचे त्याने स्वतः सांगितले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.