चित्रपट सृष्टीत अनेक बालकलाकार पुढे चालून अभिनय क्षेत्रात नाव कमावतात. काही बालकलाकार आपल्या अभिनयाने अशी छाप पाडतात की त्या भूमिका कायम स्मरणात राहतात व त्यामुळेच त्यांना पुढे काम करण्याची संधी मिळत असते.

11 वर्षांपूर्वी बिल्लू बार्बर हा बॉलिवुडचा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटात शाहरुख खान, दिपीका पादुकोण, इरफान खान, लारा दत्ता, ओम पुरी असे लोकप्रिय कलाकार दिसून आले होते. या चित्रपटात बिल्लु म्हणजेच इरफान खान याला एक लहान मुलगा व मुलगी असते. “गुंजा” हे बिल्लूच्या मुलीचे पात्र साकरणारी अभिनेत्री सध्या खूप लोकप्रिय आहे.
बिल्लू मधील “गुंजा” आता 24 वर्षाची झाली असून झी मराठी वाहिनीवर सध्या सुरू झालेल्या “लाडाची मी लेक ग” या मालिकेतून ती दिसून येत आहे. होय, मिताली मयेकर हीच ती बाल कलाकार असून ती आता अभिनय क्षेत्रात खूप पुढे गेली आहे.

मिताली मयेकर ही “लाडाची मी लेक ग” या मालिकेत कस्तुरीची भूमिका साकारताना दिसून येत आहे. यापूर्वी मिताली झी युवा वरील “फ्रेशर्स” मालिकेतून व “उर्फी” या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सध्या चालू असलेल्या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडू लागली आहे. मितालीला तीच्या भावी आयुष्यासाठी “मर्द मराठी” तर्फे खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.