बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. 2 महिन्यांपूर्वी नेहाचा पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग सोबत विवाह झाला होता. त्यावेळी देखील सर्वत्र नेहाच्या लग्नाचीच चर्चा होवू लागली होती.

आता परत एकदा नेहा ने गरोदर असल्याची फोटो पोस्ट करून चर्चेला उधाण आणले आहे. अगोदर नेहाने रोहनप्रीतसोबत गरोदरपणाची फोटो पोस्ट करून कॅपशन मध्ये “ख्याल रख्या कर” असे लिहिले होते. खरे तर नेहा गरोदर आहे हे पाहूनच अनेकांना धक्का बसला होता. 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नेहाचे इतके मोठे पोट कसे वाढले, हाच प्रश्न सर्वांना पडला होता.
त्या पोस्ट वर रोहनप्रीत ने देखील “आता जास्तच काळजी घ्यावी लागेल नेहू” अशी हिंदी मध्ये कमेंट केली होती. परंतु 1 दिवसानंतर नेहाने आणखीन एक पोस्ट करून गरोदरपणा बाबतीत मोठा खुलासा केला. नेहाने आता पोस्ट करून येत्या 22 डिसेंबरला “ख्याल रख्या कर” नावाचे गाणे प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेहा गरोदर आहे की नाही यावर आणखीन प्रश्नचिन्ह उभा आहे.
लग्नाच्या पूर्वी देखील नेहाने नेहू दा व्याह हे गाणे रिलीज करून फॅन्स ना संभ्रमात टाकले होते. नेहा खरेच लग्न करणार की फक्त गाण्याचे प्रमोशन करतेय असा प्रश्न पडला होता. आताही तसेच झाल्याने यावेळी सर्वजण तिच्यावर राग व्यक्त करीत आहेत. व्ययक्तिक जीवनाला गाण्याच्या रुपात प्रदर्शित करून नेहा पैसा कमवित असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका