परवा दिनांक 5 डिसेंबरच्या रात्री मराठी अभिनय क्षेत्रासाठी एक दुःखद घटना घडली. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची वार्ता ऐकावयास मिळाली. एक उत्तम कलाकार, अनेकांना प्रेरणा देणारी व्यक्ती, अनेक भूमिका अजरामर करणारा अभिनेता सोडून गेल्याने सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रवी पटवर्धन यांच्या शेवटच्या मालिकेत त्यांच्या सूनेचे पात्र साकारणारी अभिनेत्री निवेदिता सराफ या घटनेने खूपच भावूक झालेल्या दिसून येत आहे. निवेदिता सराफ यांनी व्हिडिओ मध्ये असे म्हटले, “रवी काका आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाही. रवी काकांसोबत मी लहानपणापासून काम करीत होते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही मिळाले.”
“आसावरीची भूमिका करता करता मी त्यांच्या खूप जवळ आले होते. स्क्रीनवर जशी आसावरी त्यांची काळजी घ्यायची, तसेच ऑफ स्क्रीन देखील आमच्या दोघांचे खूपच छान नाते तयार झाले होते. त्यांच्यातील असलेली ऊर्जा पाहून त्यांच्यापुढे नतमस्तक झालो होतो.” असे पुढे सांगत निवेदिता यांनी एक घडलेली घटना देखील सांगितली.

“शूटिंग दरम्यान त्यांचा पाय मोडला होता, तेंव्हा देखील त्यांनी जराही वेदना न दाखविता शांतपणे बसले. त्यांनी स्वतः त्यांच्या डॉक्टरांना फोन केला, मुलाला फोन केला, ॲम्ब्युलन्सला बोलविले. इतके त्यांच्या विचारात स्पष्टता होती. त्यावेळी ते पुन्हा शूटिंगला उभे राहिले होते.” असे पुढे निवेदिताने सांगितले.
बाबांचा स्पष्ट शब्दोच्चार, त्यांना पाठ असलेले श्लोक, कविता, अफाट वाचन यावरून ते एक हुशार व्यक्ती होते. आमच्या एपिसोड मध्ये त्यांचा “आसावरी”, सोहमला “कोंबडीच्या” म्हणणे, हे आमच्यासोबत सर्व प्रेक्षकही मिस करतील. काहीही प्रसंग आला तरी मी खचून जाणार नाही, हीच काकांना खरी श्रद्धांजली असेल.” अशा भावूक शब्दात निवेदिता सराफ यांनी भावना व्यक्त केल्या.
माहिती कशी वाटले ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.