काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट मधील दोन दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी क्रिकेट शौकीनांना मोठा धक्का बसला बसला होता. आता काही महिन्यानंतर आणखीन एका क्रिकेटरने संन्यास घेतल्याची बातमी समोर आली आहे.
आज दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी भारतीय क्रिकेटर पार्थिव पटेल याने सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने स्वतः ट्विट करून याबद्दल सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबतच पार्थिव ने घरगुती क्रिकेट मधून देखील संन्यास घेतला आहे. त्यामुळे तो आयपीएल 2021 मध्ये देखील आयपीएल खेळताना दिसणार नाही.
पार्थिव ने 2002 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी टेस्ट क्रिकेट मधील सगळ्यात युवा विकेटकीपर होण्याचा मान मिळविला. त्यानंतर तो भारतीय संघातून नेहमीच आत बाहेर होत राहिला. महेंद्रसिंग धोनीच्या आगमनानंतर पदार्पणानंतर पार्थिव पटेल हा भारताचा यष्टीरक्षक म्हणूनच अनेकदा भारतीय संघासोबत अनेकदा दौऱ्यावर गेला.
पार्थिव ने आज ट्विट मध्ये खास करून सौरव गांगुलीचे आभार मानले. कारण त्याच्याच कप्तानी मध्ये तो भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केला होता. पार्थिव ने शेवटचा एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारी 2012 मध्ये श्रीलंका विरूद्ध खेळला होता तर 2018 मध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. पार्थिवला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.