आपण आजपर्यंत अशा अनेक जोड्या पहिल्या असतील ज्यात दोघेंही अभिनयक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहेत. हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतदेखील अशा जोड्या पाहायला मिळतील. खूप कमी लोकांना माहिती आहे की, मराठी अभिनेते शंतनु मोघे यांची पत्नीदेखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळाच ठसा उमटविणाऱ्या शंतनु मोघे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम मिळाले. झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर राहील अशीच आहे. शिवरायांना साजेल असेच पात्र त्यांनी त्या मालिकेत स्वीकारले होते.
शंतनु मोघे यांची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे ही आहे. प्रिया मराठे हीने मराठी सोबतच काही हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांना दिसून आली आहे. “या सुखानो या” या मराठी मालिकेतून प्रियाने पदार्पण केल्यानंतर कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते हैं अशा काही हिंदी मालिकेतून दिसून आली.
शंतनु व प्रिया या दोघांचा विवाह 24 एप्रिल 2012 रोजी झाला होता. त्यापूर्वी दोघे एकमेकांचे चांगले मित्र देखील होते. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत प्रिया मराठे हीने गोदावरी नामक एक पात्र देखील साकारले होते. शंतनु मोघे हे लोकप्रिय अभिनेते श्रीकांत मोघे यांचे सुपुत्र आहेत. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.