भारतीय शिक्षण क्षेत्राला जागतिक पातळीवर ओळख करून देणारे पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सोलापूरच्या परितेवाडी येथील शाळेत शिकविणाऱ्या रणजित यांना 7 कोटी रुपयांसहित ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला होता. त्यांना हा पुरस्कार नेमके कशासाठी देण्यात आला ते वाचा.
रणजित डिसले यांनी ज्यावेळी परितेवाडी येथील शाळेत शिकविण्यासाठी गेले असता तिथे त्यांना धक्कादायक गोष्ट दिसली. जिल्हापरिषदेच्या शाळेतील एका वर्गात जनावरांचा गोठा बनविला होता. तसेच, शाळेत एक दोनच विद्यार्थी उपस्थित होते. डिसले गुरुजींसाठी प्रथमतः हेच मोठे आव्हान होते.
गावातील सर्व मुले आई वडिलांसोबत शेतात जायचे. डिसले गुरुजींनी प्रथमतः गावातील सर्व मुलांना स्वतः शेतात जाऊन अशा मुलांना शाळेत आणले. नंतर डिसले गुरुजींनी सर्व मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. शाळेत मुलांची उपस्थिती रहावी म्हणून त्यांनी सुरवातीला शाळेत मुलांना मजा मस्ती करण्याची मुभा दिली.
डिसले गुरुजींनी नंतर “अलार्म ऑफ – टिव्ही ऑफ” असा एक उपक्रम हाती घेतला. त्या कल्पनेनुसार त्यांनी एक अलार्म शाळेच्या वरी लावला. तो रोज संध्याकाळी 7 वाजता वाजल्यानंतर पुढील 1 तास गावातील सर्व पालकांनी टिव्ही बंद करून मुलांचा अभ्यास स्वतः घेण्यास सांगितले. तसेच डिसले गुरुजींनी पालकांच्या मोबाईलवर मेसेज करून काय शिकवायला हवे ते देखील सांगितले.
डिसले गुरूजींना पुरस्कार मिळण्याचा सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांनी पाठ्य पुस्तकात सुरू केलेली क्यू आर कोड (QR Code) ची निर्मिती. प्रत्येक पानावर त्या त्या पाठाचा आशय त्या QR कोड मध्ये व्हिडिओ, ऑडिओ स्वरूपात असायचा. यामुळे मुलांना कसलीच अडचण येत नव्हती.
याच सर्व गोष्टींचा विचार करून डिसले गुरूजींना युनेस्को आणि वार्की फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार व 7 कोटी रुपये देण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय ठरले. तसेच त्यांनी 7 कोटी रुपयांतील अर्धी रक्कम उर्वरित अंतिम 9 शिक्षकांना दिला. डिसले गुरूजींना सध्या कोरोनाची लागण झाली असून ते यातून लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका.