खरे तर 2020 हे संपूर्ण वर्ष सर्वच राशींच्या लोकांना अत्यंत त्रासदायक व संकटांचा सामना करावा लागणारे गेले. अनेक ज्योतिषांनी या संदर्भात अचूक भाकीत देखील केले होते. आता ज्योतिषकार अमृता कुलकर्णी यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार येणाऱ्या काही दिवसात 3 राशींच्या जीवनात सुख समृध्दी नांदणार असल्याचे समजते.
ज्योतिषी अमृता कुलकर्णी यांच्या भविष्यवाणीनुसार मेष राशी वाल्यांना येणारा आठवडा अत्यंत उत्साही जाईल. कामे खूप आणि वेळ कमी अशी काही अवस्था होवू शकते. काही जणांना गुरुकृपेची प्रचिती येईल. सोमवारी तुळशीच्या रोपाची पूजा करावी व 108 प्रदक्षिणा घालाव्यात. अनेक वाईट गोष्टी नष्ट होवून प्रारब्धाचे चांगले योग सुरू होतील.
येणाऱ्या काही दिवसात तूळ या राशींच्या जातकाना या आठवड्यात अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याच्या संधी आहेत. व्यावसायिकांना ओळखीतून मोठा धनलाभ देखील होवू शकतो. शिवमंदिरात शिवपिंडीला काळे तीळ अर्पण करावेत.
सर्व ग्रहमान बघता येणाऱ्या आठवड्यात “धनु” रास ही या आठवड्यातील सर्वोत्तम रास ठरू शकते. या राशी वाल्यांना अनेक कार्यक्षेत्रात सफलता मिळू शकते. फक्त नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन कल्पना राबवण्यास अत्यंत सुंदर काळ ठरणार आहे. सोमवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ व्हावे त्याच प्रमाणे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने सर्व अडचणी दूर होवून सुखाचे दिवस येऊ शकतील.
माहिती आवडली तर नक्की कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.