2020 या वर्षात सर्वच राशींच्या लोकांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागला होता. आता येणारे काही दिवस काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरतील, असे भाकीत प्रसिद्ध ज्योतिषकार अमृता कुलकर्णी यांनी सांगितले आहे. तरी काही राशीना संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्वप्रथम ज्या राशींच्या लोकांसाठी सुखाचे दिवस असणार आहेत ती रास म्हणजे कर्क रास. कर्क रास ही पुढील काही दिवसातील सर्वात शुभ रास ठरेल. विवाह ठरविण्याच्या दृष्टीने अनेक शुभग्रह अनुकूल राहतील. ठरवून केलेला विवाह हा प्रेमविवाहापेक्षा अधिक शुभदायी ठरेल. विशेषतः आश्लेषा नक्षत्राच्या ज्ञातकासाठी हे जास्त फलदायी ठरेल.
तसेच, संपूर्ण कर्क राशी वाल्यांना पूर्व संचीतातून लाभ संभवतो. पांढऱ्या रंगाच्या मांजरीला किंव्हा बोक्याला दूध पाजले तर अनेक गोष्टी सुकर होतील. कर्क राशी प्रमाणेच कन्या ही रास सप्ताहातील वैभवसंपन्न रास ठरेल. पंच – पंचयातील शनी – गुरूची युती तुम्हाला तुमच्या पूर्व पुण्याईचे फळ अत्यंत घवघवीत देईल.
कर्क राशीच्या लोकांच्या हातामध्ये येणाऱ्या काही दिवसात लक्ष्मी येत राहील. अनेक जुन्या गोष्टी नव्याने सुरू होतील. कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा सतत येत राहील. जुन्या प्रॉपर्टी चे व्यवहार करण्यास उत्कृष्ट काळ आहे. पांढऱ्या रंगाच्या गाईस केळ खाऊ घातल्यास पूर्वजांची कृपा अपरंपार राहील.
8,9,10 या तारखा कुंभ राशी वाल्यांसाठी देखील शुभ राहतील. शुक्राची कृपा दृष्टी असल्यामुळे प्रत्येक कार्य वेगाने पूर्ण होईल. इतके दिवस अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता सहज साध्य होतील. काही जणांना मान सन्मान प्राप्त होतील. नोकरदारांना प्रमोशन होण्याच्या संधी आहेत. व्यावसायिकांना देखील नवीन मार्ग सापडतील. या राशीच्या लोकांनी तांबड्या रंगाच्या गाईला गुळ घातला तर ते अधिक फलदायी ठरेल.
तसेच, मिथुन व सिंह राशींच्या लोकांना काही संकटे उद्भवू शकतात. मिथुन राशी वाल्यांना कायदेशीर कटकटीचा सामना करावा लागू शकतो. तर सिंह राशी वाल्या लोकांचे जोडीदारासोबत मतभेद होवू शकतात. तसेच त्यांनी कायदा वा नियम मोडल्यास त्याचा त्रास होवू शकतो.
माहिती उपयुक्त वाटली तर शेयर करा व कमेंट करायला विसरू नका