सध्या झी मराठी वाहिनीवर कारभारी लयभारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस ठरत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार अल्पावधीतच प्रेक्षकांना आवडू लागली आहेत. मालिकेत महत्त्वाचे पात्र साकारणारी शोना मॅडम खऱ्या आयुष्यात कोण आहे, हे जाणून घेऊयात.
शोना मॅडमचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव रश्मी पाटील आहे. रश्मी पाटील मूळची पुणे शहरातील आहे. पुण्यातच तिने शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच तिला नृत्यकलेची आवड होती. याबाबतीत तिला तिच्या घरच्यांकडून देखील पूर्ण पाठिंबा होता. यामुळेच तिला जास्त प्रोत्साहन मिळत गेले.
पुढे चालून रश्मीने अनेक लावणीवर नृत्य करीत लोककला जोपासली. तिच्या डान्सच्या अनेक व्हिडिओज तिच्या युट्यूब चॅनेल वर दिसून येतात. कारभारी लयभारी मालिकेत शोना मॅडम सध्या अंकुशराव पाटील याला धोका देताना दिसणार आहे. त्यामुळे शोना मॅडम हे मालिकेत यापुढे मोठे कारस्थान रचताना दिसेल.
रश्मी पाटील या अभिनेत्रीने यापूर्वी मी मराठी वाहिनीवरील प्राजक्ता या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून आली होती. या गोल गोल डब्यातल्या, दुर्गे दुर्गत भारी, आता मी कशी दिसते या मराठी चित्रपटात देखील ती दिसून आली होती. तसेच रश्मीने काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तिच्या लावणीवरील काही डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका