गेल्या वर्षभरात अभिनय क्षेत्रामधून एकापेक्षा एक मोठे धक्के बसलेले पाहायला मिळत आहेत. या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाची वार्ता ऐकावयास मिळाल्या. आता मराठीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.
रवी पटवर्धन यांच्या अभिनय कौशल्याबाबतीत प्रेक्षकांकडून नेहमीच प्रशंसा केली जायची. अनेक चित्रपट, मालिका, नाटक त्यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवून सोडली होती. वयाची 80 ओलांडल्या नंतर देखील रवी पटवर्धन यांच्या अभिनयात एका युवा अभिनेत्यासारखी ऊर्जा दिसून येत होती.
रवी पटवर्धन यांना काल दिनांक 5 डिसेंबर रोजी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे रात्रीच निधन झाले. यापूर्वीही रवी यांना मार्च मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या निधनाने अनेक मराठी कलाकारांना व फॅन्सना धक्का बसला आहे.
रवी पटवर्धन यांनी 150 पेक्षा अधिक नाटक तर 200 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. वयाच्या 82 वर्षी देखील आरण्यक नाटकातील त्यांची धृतराष्ट्राची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. तसेच त्यांची शेवटची मालिका अग्गबाई सासूबाई मालिकेत देखील त्यांनी तितक्याच ऊर्जेने काम करताना दिसून येत होते.
रवी पटवर्धन यांना “मर्द मराठी”तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हीही कमेंट मध्ये श्रद्धांजली द्या व शेयर करायला विसरू नका