मागील वर्षभरात अनेक मराठी सेलिब्रिटींचे लग्न, साखरपुडा झाल्याची बातम्या ऐकायला मिळाली. नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, अर्चना निपाणकर शर्मिष्ठा राऊत, अभिज्ञा भावे या अभिनेत्रीनी आपापल्या प्रेमाला नात्यात बदलले. आता आणखीन एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.
मराठी अभिनेत्री सई लोकुर हीचे लग्न झाल्याची माहिती स्वतः सईने सोशल मीडयाद्वारे कळविले. 2 ऑक्टोबर रोजी सईचा तिर्थदीप रॉय या मुलासोबत विवाह केला होता. त्यावेळी दोघांच्या साखरपुड्याचे फोटोज सर्वत्र व्हायरल झाले होते. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला होता.
सई लोकुरचा जोडीदार तिर्थदिप हा एक वरिष्ठ संशोधन अभियंता असून तो बँगलोर येथे कार्यरत होता. परंतु त्याने सई साठी मुंबईमध्ये स्थायिक झाला. दोघांनी लग्न देखील काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीतच केले. दोघांनी लग्नासाठी स्पेशल पेशवाई पेहराव केला होता.
सईने हिंदी चित्रपट “कुछ तुम कहो कुछ हम कहे”, “किस किसको प्यार करू”(कपिल शर्माच्या बायकोचा रोल) मध्ये अभिनय केला आहे. तसेच बिगबॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये देखील सई दिसून आली. सई लोकूर व तीर्थदिप रॉय या दोघांना मर्द मराठी तर्फे भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.