मराठी कलाकार अभिनयाच्या बाबतीत बॉलिवुड पेक्षा नक्कीच अग्रेसर असतात. परंतु बॉलिवुड सारखे मराठी चित्रपटांना फारसे यश मिळालेले दिसून येत नाही. त्यामुळे अनेक गुणवान मराठी कलाकारांना अभिनयाची योग्य ती पोचपावती मिळत नाही. संतोष जुवेकर सारखा उत्तम अभिनेता सध्या एका व्हिडिओ मुळे खूप चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता संतोष जुवेकर एका चित्रपटाच्या शूटिंग साठी लंडनला गेला आहे. त्याच्या सोबत सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे हे कलाकार देखील गेले आहेत. परंतु भारत सरकारने इंग्लंडहून येणाऱ्या सर्व विमानसेवा रद्द केल्याने हे कलाकार तिथेच अडकून राहिले.
संतोष जुवेकर हा अभिनेता सोशल मीडियावर नेहमीच आपल्या पोस्ट द्वारे फॅन्सची करमणूक करीत असतो. आता संतोषने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो घराची साफसफाई करताना दिसून येत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तो मी माझ्या इच्छेने काम करीत असल्याचे म्हणताना दिसला. परंतु व्हिडिओच्या शेवटी त्याचा मित्र त्याला नीट साफ सफाई करण्याचे आदेश देताना दिसून येत आहे.
हा व्हिडिओ संतोष ने एक विनोदाचा भाग म्हणून तयार केला. यावर अनेक फॅन्स ना हसू देखील आवरता आले नाही. व्हिडिओ पाहून अनेकांना संतोष वर ही वेळ कशी आली हा प्रश्न देखील पडला. परंतु कॅपशन मध्ये संतोष ने स्पष्ट लिहिले आहे की त्याच्या मित्राला देखील अभिनयाचा किडा लागल्याचे सांगितले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका