टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मराठी चॅनेल झी मराठीला करोडो लोकांची पसंती असते. झी मराठीवर आता येणाऱ्या काही दिवसात मोठे बदल झालेले पाहायला मिळू शकतात. लवकरच झी मराठीची लोकप्रिय मालिका “तुझ्यात जीव रंगला” संपणार असून “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेचा वेळ बदलण्यात येणार आहे.


येत्या 4 जानेवारी पासून झी मराठीवर “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका सोम. ते शनी. रात्री 8 वाजता असणार आहे. या मालिकेचे काही प्रोमो देखील प्रसारित करण्यात आले आहेत. परंतु या मालिकेचा हिरो कोण असेल हे मात्र अद्याप समजू शकले नव्हते.

Shalv Kinjwadekar news

“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत अभिनेत्याच्या भूमिकेत शाल्व किंजवडेकर हा दिसणार आहे. शाल्व हा यापूर्वी बहुचर्चित हिंदी चित्रपट “हंटर” मध्ये दिसून आला होता. यानंतर शाल्व “बकेट लिस्ट”, “एक सांगायचं” या चित्रपटात देखील दिसून आला होता. आता या नवीन मालिकेतून तो छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

Shalv Kinjwadekar news

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत शाल्व हा अन्विता फलटणकर हिच्या पतीचा अभिनय करताना दिसेल. तसेच, शाल्वच्या आईच्या भूमिकेत लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले असणार आहेत. तसेच मालिकेत दीप्ती केतकर ही अभिनेत्री देखील दिसून येणार आहेत.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *