मागील वर्षभरात अनेक सेलिब्रिटींनी बाळाच्या आनंदाची बातमी फॅन्सना दिलेले पाहायला मिळाले. विराट-अनुष्का, सैफ-करीना कपूर, हार्दिक पांड्या-नताशा यांनी फॅन्स सोबत आनंदाची बातमी शेअर केली. आता एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरातून देखील लवकरच गोड बातमी ऐकायला मिळणार आहे.

होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता शशांक केतकर हा लवकरच वडील होणार असल्याचे त्याने स्वतः सांगितले. शशांकने पत्नी प्रियांका सोबत एक फोटो पोस्ट करीत फॅन्स ना ही बातमी शेअर केली. फोटो मध्ये शशांक प्रियांकाच्या पोटाला कान लावलेला दिसून येत आहे.
फोटो पोस्ट करीत शशांक म्हणाला, “आपल्याला नेहमीच वाटायचं की सांताक्लॉज यावे आणि सर्वांवर गिफ्टचा वर्षाव करावा. पण आम्हाला माहिती नव्हतं की खरेच आम्हाला एक गिफ्ट मिळेल. सर्वांना आमच्या तिघांतर्फे सुट्ट्यांसाठी शुभेच्छा.” या पोस्टला अनेक कलाकारांनी व फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला दिसून येत आहे.
शशांक व प्रियांका यांचा विवाह 4 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. अनेक मालिका व चित्रपटातून शशांकने अभिनयाचा ठसा उमटविला आहे. हे मन बावरे ही मालिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. त्याची पत्नी प्रियांका ही पेशाने वकील आहे. दोघांना येणाऱ्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका