तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेने गेल्या 12 वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेला देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून प्रेम मिळत असते. मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची एक वेगळीच ओळख करून ठेवली आहे.

Sonu bhide real life


तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत सोनू भिडे हे पात्र आजपर्यंत 3 अभिनेत्रींनी साकारले आहेत. यातील सुरुवातीच्या काही भागांमध्ये दिसून आलेली सोनूचे पात्र झील मेहता या अभिनेत्रीने साकारले होते. झीलने नंतर मालिका सोडली होती याचा खुलासा तिने आत्ता केला आहे.

Sonu bhide real life


झीलने जेंव्हा मालिकेत काम करायला सुरुवात केली होती त्यावेळी ती फक्त 9 वर्षाची होती. त्यानंतर ती तारक मेहताच्या मालिकेत 4 वर्षे दिसून आली होती. मालिका दीर्घकाळ चालल्याने मालिकेत अनेक बदल होत गेले. त्यातच झील ने वयाच्या 14 व्या वर्षी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय तिने तिच्या शिक्षणासाठी घेतला होता.

Sonu bhide real life
झील अभ्यासात हुशार असल्याने तिला दहावीच्या परीक्षेत 93% देखील मिळाले होते. पुढे चालून झीलने एमबीए पर्यंतचे शिक्षण घेतले. झील मेहता आता 24 वर्षाची झाली असून ती आता एका ई कॉमर्स कंपनीमध्ये जॉब करीत आहे. तिच्यात झालेला बदल व तिच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असते.

Sonu bhide real life

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *