गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक चढउतार झालेले पाहायला मिळाले. काही महिने सर्वच मालिकांच्या शूटिंग बंद देखील कराव्या लागल्या होत्या. झी मराठी या वाहिनीवरील मालिकांमध्ये मोठे फेर बदल झालेले पाहायला मिळाले. आता समोर आलेल्या माहिती नुसार झी मराठीवरील 1 लोकप्रिय मालिका बंद होणार असून दुसऱ्या मालिकेचा वेळ बदलणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
झी मराठी वाहिनीवरील येणाऱ्या प्रत्येक मालिका या लोकप्रिय होतच असतात. 4 वर्षापूर्वी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू झालेली तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे ऐकण्यात येत आहे. या मालिकेची शूटिंग संपली असून मालिका बंद होणार असल्याचे मालिकेतील मंदा ने कमेंट द्वारे सांगितले आहे. या मालिकेला गेल्या 4 वर्षात भरभरून प्रेम मिळाले होते.
राणा अंजलीच्या प्रेमापासून सुरू झालेल्या “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेने टीआरपी मध्ये सातत्य ठेवले. लॉकडाऊन नंतर मालिका जेंव्हा सुरू झाली तेंव्हा मालिकेत नंदिता या पात्रात बदल करण्यात आला. आता मालिकेच्या शेवटी काय घडणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
काही दिवसापासून माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका देखील संपणार असल्याची अफवा पसरविली जात होती. परंतु ही केवळ अफवा असून मालिकेची शूटिंग आणखीन चालू असल्याचे समजते. त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या वेळेत बदल होणार असल्याचे ऐकण्यात येत आहे. नेहमीच टीआरपीचे रेकॉर्ड मोडणाऱ्या माझ्या नवऱ्याची बायको नेहमीच काही तरी मनोरंजक दाखविण्यात येत असते.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत आता माया व गुरू मोठा प्लॅन करताना दिसून येत आहेत. त्यांचा प्लॅन फसतो की ते यात यशस्वी होतील, हे पाहणे मनोरंजक ठरेल. तसेच झी मराठीवर आता “येऊ कशी कशी मी नांदायला” ही मालिका 4 जानेवारीपासून संध्याकाळी 8 वाजता पाहायला मिळणार आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका