सध्या सर्वत्र लगीन सराईची धूम धाम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या तारखा अनेक असल्याने अनेक कलाकारांचे साखरपुडा लग्न सोहळे झालेले पाहायला मिळत आहेत. यामध्ये आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली आहे.
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हीचा 2 महिन्यांपूर्वी मेहुल पै यांच्यासोबत साखरपुडा झाला होता. यामुळे अभिज्ञा लग्न कधी करणार याची उत्सुकता सर्व फॅन्स ना होती. आता अभिज्ञाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे अभिज्ञाच्या मेहंदी समारंभाच्या काही फोटो व व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहेत.
अभिज्ञा व मेहुल यांचे लग्न 6 जानेवारी 2020 रोजी अंधेरी येते होणार आहे. साखरपुडा जरी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला असला तरी विवाह सोहळा मात्र जल्लोषात होण्याची शक्यता आहे. लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित राहू शकतात.
अभिज्ञाचा होणारा पती मेहुल पै हा एक ऑपरेशन मॅनेजर असून तो “क्लासवर्क इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. अभिज्ञा भावे देखील तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना अशा अनेक लोकप्रिय मालिकेतून दिसून आली आहे. दोघांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका