सध्या सर्वत्र लगीन सराईची धूम धाम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या तारखा अनेक असल्याने अनेक कलाकारांचे साखरपुडा, लग्न सोहळे झालेले पाहायला मिळत आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचे आज लग्न झाले आहे.
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हीचा 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी मेहुल पै यांच्यासोबत साखरपुडा झाला होता. यामुळे अभिज्ञा लग्न कधी करणार याची उत्सुकता सर्व फॅन्सना होती. गेल्या काही दिवसांपासून लग्नापूर्वीच्या तिच्या अनेक सोहळ्याचे फोटोज् व्हिडिओज व्हायरल होताना दिसून येत होते.
अभिज्ञा व मेहुल यांचे लग्न आज 6 जानेवारी 2020 रोजी पवई येथे पार पडला. या सोहळ्याला तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, मयुरी देशमुख, तसेच तुला पाहते रे मालिकेतील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिज्ञा व मेहुलच्या परिवारातील सर्वच सदस्य या लग्नाला उपस्थित होते.
अभिज्ञाचा होणारा पती मेहुल पै हा एक ऑपरेशन मॅनेजर असून तो “क्लासवर्क इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. मेहुलने लग्नात जांभळ्या रंगाची शेरवानी तर अभिज्ञा ने जांभळ्या रंगाची पेशवाई साडी घातली होती. दोघे या पेहरावात खूपच सुंदर दिसत होते. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका