14 जून 2020 रोजी बॉलिवूडला हादरवून सोडणारी एक घटना घडली होती. लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधन झाल्याची वार्ता आली आणि संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आले. आज सुशांत सिंग राजपूत याचा जन्मदिवस असून सोशल मीडियावर सर्वत्र त्याला अभिवादन करण्यात येत आहे.

सुशांतची पूर्व गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हीला या घटनेतून सावरायला खूप वेळ लागला. सुशांतच्या निधनाचे तिला इतके दुःख झाले होते की तिने तब्बल महिनाभर स्वतःला व्यक्त केली नव्हती. परंतु त्यानंतर तिने तिच्या मनातील सर्व दुःख व्यक्त केले. सुशांतच्या जन्मदिवशी अंकिताने काही जुन्या व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत.
अंकिता ने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ मध्ये सुशांत हा अंकिताचा कुत्रा “स्कॉच” सोबत धमाल करताना दिसून येत आहे. “तुझ्या फक्त याच आठवणी आता माझ्याजवळ आहेत. तू जिथे असशील तिथे आनंदी रहा. हॅप्पी बर्थडे सुशांत. तुझी आठवण येत राहील” असे कॅप्शन अंकिताने टाकले आहे.
सुशांत व अंकिता मध्ये किती जास्त प्रेम होते हे सर्वांनाच माहिती आहे. अंकिताने आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात सुशांत त्याचा आवडता अभिनेता शाहरुख खान याची नकल करताना दिसून येत आहे. या व्हिडिओच्या शेवटी सुशांत व अंकिता एकत्र नाचताना देखील दिसून येत आहेत. सुशांतच्या प्रथम स्मृतिदिनी निमित्त विनम्र अभिवादन.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.