गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी छोट्या चिमुकलीचे आगमन झाले होते. परंतु त्यांनी बाळाचे फोटो दाखवली नसल्याने फॅन्स मध्ये उत्सुकता कायम राहिली आहे. अशातच मराठमोळा अभिनेता अंकुर वाढवे याच्या घरी देखील मुलीचे आगमन झाले आहे.
चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मधून प्रसिध्दी मिळविणाऱ्या अंकुर वाढवेला काल मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्न प्राप्त झाले. त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून करून ही आनंदाची बातमी सांगितली. बाळासोबत काढलेल्या फोटोत अंकुर व त्याची पत्नी खूपच आनंदी दिसून येत होते.
उंचीने कमी असून देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमविलेल्या अंकुर ने नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवित असतो. अंकुर वाढवे हा 28 जून 2019 रोजी लग्नबंधनात अडकला होता. “कालच्या दिवशी मी एका नवीन पात्रात प्रवेश केला.. आता मी एका मुलीचा बाप झालो” असे अंकुर ने पोस्ट्स च्या कॅपशन मध्ये लिहिले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या छोट्याश्या गावातून पुढे आलेला अंकुर ने चला हवा येऊ द्या सोबतच गाढवाचं लग्न या चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच निम्मा शिम्मा राक्षस या नाटकात देखील उत्तम भूमिका साकारताना दिसून येतो. अंकुर वाढवे व त्याच्या पत्नीला खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका