भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली व बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा या लोकप्रिय जोडीला 11 जानेवारी रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. या दोघांसाठी व सर्व फॅन्स साठी ही एक मोठी आनंदाची बातमी होती. विराट ने स्वतः सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेयर केली होती.

Anushka after baby birth


तब्बल 10 दिवसानंतर विराट व अनुष्का आज मीडियासमोर आले होते. मुंबईच्या बांद्रा येथे विराट व अनुष्का त्यांच्या मुलीला चेकअप साठी घेऊन गेले होते. त्यावेळी मीडियाने दूर वरूनच दोघांच्या फोटो घेतल्या. यावेळी विराट व अनुष्का मिडीयाला पोझ देताना देखील दिसून आले.

फोटो मध्ये पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की अनुष्काची 10 दिवसांपूर्वीची प्रसूती झाली आहे. प्रेग्नंट होण्यापूर्वी अनुष्का जितकी फिट होती तितकीच ती आत्ताही दिसत होती. यावेळी अनुष्काने चक्क डेनिम जीन्स घातलेले दिसून येत होते. विराट ने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

विराट व अनुष्का दोघेही आनंदी दिसत होते व मिडीयाला चांगला प्रतिसाद देखील देत होते. काही दिवसापूर्वी विराट ने मीडियाला विनंती केली होती की जन्मलेल्या मुलीची आत्ताच कोणीही फोटो काढायला बघू नये. त्यामुळे 10 दिवस उलटले असले तरी फॅन्स ना आणखीन विरुष्काच्या मुलीची फोटो पाहायला मिळाली नाही.

Anushka

माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.