झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला संपल्यानंतर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 4 जानेवारी 2021 पासून “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सुरू झाली असून मालिका लोकांच्या पसंतीस देखील उतरत आहे. आज आपण या मालिकेतील मुख्य अभिनेत्री बद्दल जाणून घेऊयात.
“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका अन्विता फलटणकर ही साकारताना दिसून येत आहे. मालिकेत अन्विता ही स्वीटू हे पात्र साकारत असून तिला एक गरीब मध्यम वर्गीय घरातील मुलगी दाखविण्यात आली आहे. परंतु ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की, अन्विताने यापूर्वी एका लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे.
अन्विता ही यापूर्वी आपल्याला टाईमपास या लोकप्रिय चित्रपटातून सर्वप्रथम दिसून आली होती. तिने त्या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीचा म्हणजेच चंदाचा अभिनय केला होता. टाईमपास तिच्या या अभिनयाने प्रेक्षकांना खूपच हसविले होते. आता नवीन मालिकेत तिला पाहून अनेकजण ओळखू शकले नाहीत.
अन्विता फलटणकर ही टाईमपास सोबतच गर्ल्स या चित्रपटातून देखील दिसून आली होती. तसेच तिने यू टर्न या वेब सिरीज मध्ये देखील काम केले आहे. आता झी मराठी वरील नवीन मालिकेमुळे तिच्या करीयर ला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. अन्विताला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.