क्रिकेट जगतातील किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली व बॉलीवुडची अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीला कन्यारत्न प्राप्त झाले. विराट कोहलीने स्वतः पोस्ट करून मुलगी झाल्याचे सांगितले. परंतु, त्याने त्याच्या मुलीचा फोटो शेयर केला नव्हता. परंतु एका सेलेब्रिटी ने मात्र त्यांच्या बाळाची फोटो शेयर केली आहे.
विराट-अनुष्काने 11 जानेवारीला मुलीला जन्म दिला त्याच दिवशी भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगट हीने देखील एका गोड बाळाला जन्म दिला. बबिता व तिचा पती विवेक सुहाग यांना पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. बबिता व विवेक ने स्वतः ही माहिती फॅन्स सोबत शेयर केली.
विराट अनुष्काने जरी त्यांच्या मुलीचा फोटो इतक्यात पोस्ट न करण्याचा निर्णय घेतला असला तरी बबिताने मात्र त्याच दिवशी बाळाची फोटो पोस्ट करून फॅन्सना सांगितले. “भेटा आमच्या लहान मुलाला. आम्ही खूप आनंदी आहोत. देवाचे खूप आभार.” अशा शब्दात विवेक ने आपला आनंद व्यक्त केला.
बबिताने आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत भारताचे नाव उज्वल केले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावले आहे. तिला अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बबिता मुलाच्या फोटो पाहिल्यानंतर आता फॅन्स ना विरुष्काच्या मुलीला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
बबिताला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आवडली तर शेयर करायला विसरु नका