झी मराठी वाहिनी गेल्या काही दिवसांपूर्वी टीआरपीमध्ये खाली घसरताना दिसून येत होती. परंतु आता नवीन मालिका आल्यामुळे झी मराठीचा टीआरपी परत एकदा वाढण्याची शक्यता आहे. परंतु, आता येणाऱ्या काही दिवसात झी मराठीची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे.
काही मालिका काहीच महिने चालत असतात, परंतु अशा मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येतो. तुला पाहते रे, रात्रीस खेळ चाले अशा काही मालिकांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. अशातच सध्या झी मराठीवर गाजत असलेली देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते.
31 ऑगस्ट 2020 पासून सुरू झालेली देवमाणूस ही मालिका एका सत्यघटनेवर आधारित आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील वाई जवळील ढोम या गावातील होती. तीच घटना मालिकेच्या रूपातून दाखविण्यात आली आहे. त्या घटने नुसार, एका बोगस डॉक्टर ने 5 महिला व एका पुरुषाचा खून केले होते.
त्यामुळे देवमाणूस या मालिकेच्या शेवटी अजितकुमार आणखीन एक खून करतो. यावेळी त्याचा डाव फसून त्याला पोलीस कोठडी झालेली पाहायला मिळू शकते. देवमाणूस या मालिका येणाऱ्या काही भागात अतिशय मनोरंजक होवू शकते व ही सत्य घटना असल्याने शेवटचे काही एपिसोड पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येण्याची शक्यता आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका