गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या कन्येला घेऊन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु, या जोडीने काही दिवस त्यांच्या मुलीची फोटो शेयर करणार नसल्याचे सांगितले होते. आता मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरून देखील आनंदाची बातमी आली आहे.

धनश्री सोशल मीडिया नेहमीच ॲक्टिव असलेली पाहायला मिळते. तिने गरोदर झाल्यापासून नेहमीच फोटो शूट करताना दिसून येत होती. त्यामुळे साहजिकच तिचे फॅन्स देखील बाळाच्या आगमनासाठी उत्सुक होते. काल दिनांक 28 जानेवारी रोजी धनश्री ने स्वतः पोस्ट करून पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे सांगितले आहे.
धनश्री ने पोस्ट करताना असे लिहिले, “आम्ही तुम्हाला सांगायला खूप आनंदी आहोत की आज सकाळी आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. मी आणि बाळ एकदम ठीक आहोत. आम्हाला प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा दिल्या बद्दल सर्वांचे खूप खूप आभार.” धनश्री सोबतच तीचे पती दुर्वेश देशमुख यांनी देखील ही आनंदाची बातमी सांगितली.
गेल्या काही महिन्यात धनश्री ने बेबी बंप सोबत अनेक फोटो काढलेले दिसून आले. प्रत्येक फोटोज् मध्ये धनश्री अतिशय सुंदर दिसून येत होती. गरोदरपणातील फोटोज् मध्ये ती अनेक महिलांचे आकर्षण ठरत होती. आता आई-बाबा झालेल्या धनश्री व दूर्वेश ने प्रायव्हसी ठेवीत काही दिवस बाळाची फोटो पोस्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका