गेल्या वर्षभरात कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी निरोप घेतला. त्यामुळे 2020 वर्ष हे अभिनय क्षेत्रासाठी एक अत्यंत दुःखद असेच ठरले. गेल्याच वर्षी 14 जून रोजी बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृतदेह राहत्या घरी पंख्याला लटकलेला आढळून आला होता. आता आणखीन एक अशीच घटना समोर आली आहे.
कन्नड चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जयश्री रमैय्या या अभिनेत्रीने देखील आत्महत्या केली असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. जयश्री ही गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होती व त्यासाठी उपचार देखील घेत होती. बँगलोर येथील ज्या किराणा आश्रमात उपचार घेत होती तिथेच तिने गळफास घेतल्याचे समोर आले आहे.
जयश्री ने गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिच्या फेसबुक अकाऊंट वर एक धक्कादायक पोस्ट करून खळबळ माजवली होती. “मी हरले, या जगाचा व डिप्रेशनला गुडबाय” अशी पोस्ट तिने त्यावेळी केली होती. परंतु नंतर तीनेच “मी ठीक आहे, सर्वांना खूप प्रेम” अशी पोस्ट करून सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले होते.

आज सकाळी जयश्रीला घरच्यांनी अनेक कॉल मेसेज करून पाहिले. पण तिने प्रतिसाद नाही दिल्याने आश्रम मध्ये संपर्क साधला. नंतर जयश्री पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढलून आली. जयश्री रमैया ही लोकप्रिय शो बिग बॉस कन्नडा सिझन 3 मधील स्पर्धक राहिली होती. तिच्या जाण्याने कन्नड कला सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.