कोणत्याही आई वडिलांना आपल्या लेकरांसाठी जिव्हाळा हा असतोच. तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्या लेकराला जपलेले बाळ जर आपल्यापासून दूर गेले तर कोणत्याही आई वडिलांना दुःख होत असते. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी एका आईला तीचे बाळ वापस मिळवून देण्यात यश मिळाले आहे.
ही घटना आहे मुंबईच्या मालवणी येथील. मालवणी पोलीस ठाणे येथे दि 6.1.21 रोजी फिर्यादी श्रीमती पुजा अशोक राठोड 24 वर्ष हिने तक्रार दिली की तिचे बाळ कु. वैष्णवी 1 वर्षे हिचे अपहरण झाले. फिर्यादीनुसार एक महिला पुजा राठोड यांच्या घरी आश्रयासाठी आली होती.
एक मदत म्हणून राठोड कुटुंबीयांनी तिला आश्रय दिला. परंतु त्या महिलेने पुजा अशोक राठोड यांच्या बाळाचेच अपहरण केले. अशी फिर्याद प्राप्त होताच मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी त्याच्या वेगवेगळ्या टिम बनवून कल्याण स्टेशन, मुंब्रा, ठाणे घोडबंदर रोड, येथे पाठवून तांत्रिक मदतीच्या साह्याने अहोरात्र मेहनत घेऊन अतिशय संयमाने व काळजीपूर्वक तपास हाताळून अपहृत बाळाला व आरोपी ला ताब्यात घेतले.
नंतर मालवणी पोलिसांनी 1 वर्षाच्या वैष्णवीला तिच्या आई वडीलांच्या ताब्यात दिले. आईने वैष्णवीला पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी मालवणी पोलिसांचे आभार मानतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अर्जुन रजाने व सर्व पोलिसांचे खूप खूप आभार.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.